आज सकाळपासून एक ढकलपत्र जालावर फिरतेय. (माझ्या ८ मित्रांनी पाठवलंय मला आजच्या दिवसात).
सचिनची कुणीतरी आरती लिहिलीये. कोणी लिहिलंय ठाऊक नाही.
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता आनंदाची!
अविस्मरणीय खेळी तुझी द्विशतकाची!
सर्वांगी सुंदर उधळण चौकारांची!
आकाशी झळके माळ उत्तुंग षटकारांची!
जय देव जय देव जय तेंडुलकरा!
तुझ्या चरणी माझा मानाचा मुजरा! जय देव जय देव..
१४७ चेंडू खेळपट्टीवरी उभा!
सर्व गोलंदाजांची दिसे दिव्य शोभा!
मदतीला कार्तिक पठाण धोनी आलेगा!
धावांचा डोंगर उभा राहिला बघा! जय देव जय देव..
दुमदुमले मैदान झाला जल्लोष!
थरथरला गोलंदाज मानिला खेद!
कडाडली बॅट चेन्डुचा शिरच्छेद!
असामान्य अद्भुत शक्तिचा शोध! जय देव जय देव..
चांगलं लिहिलंय.. पण इतकं खास वाटत नाही.. म्हणजे शब्द उगाच घुसवून भरल्यासारखे वाटतात.. आणि सर्वस्वी सचिनच्या २०० धावांवरच लक्ष दिलंय.. सचिन हा असा विषय आहे की लिहायला घेतलं तर शब्द अपुरे पडतात.. त्याची आरती म्हणजे त्याचं गुणगान हवं .. केवळ त्याच्या एकाच खेळीच गुणगान करून कसं चालेल? म्हणून मला प्रेरणा मिळाली.. आणि मीच एक आरती लिहूया म्हटलं ..
कृपया याकडे एका मर्त्य मानवाची केलेली अवास्तव भक्ती या दृष्टिने पाहू नका.. 'सचिनला विनाकारण दिलेलं देवपण' या विषयावर चर्चा रंगवू नका.. भावना समजून घ्या..
जय देव जय देव जय सचिनदेवा,
संकटसमयी करिती, कठिण समयी करिती, सर्व तुझा धावा.. जय देव जय देव..
धावांचा शतकांचा विक्रमादित्य,
अब्जो हृदयांचा राजा तू नित्य,
दु:खे विसरूनि तुजला पाहती जन,
आनंदाला येई त्यांच्या उधाण.. जय देव जय देव..
बॅटच तुझी देते प्रश्नां उत्तर,
बोलकि तोंडे बंद करिशी सत्वर,
खेळ तुझा पाहुनी धन्य जीवन,
रवि'दास' आजन्म चरणाशी लीन.. जय देव जय देव!
आरत्यांचे वृत्त मला ठाऊक नाही कुणास ठाऊक असल्यास जरूर सांगावे..
mastach...
ReplyDeleteaata hya ganpatila aaratisangraha madhe hi pan aarati samavun ghetli pahije itki chhan aahe :)
mala donhi aaratya aavadalya......1st ji koni lihili aahe ti particularly 200* inning sathi aahe.....& i liked it....tu lihileli aarati pan ekdam chaan aahe!!!
ReplyDelete